पाहता पाहता मोठे झालो ! एक छान मराठी कविता

पाहता पाहता मोठे झालो !

आयुष्यात काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी त्या त्या वयात महत्वाच्या असतात. आपण प्रत्येकजण आपले बालपण ते वयोवृद्ध स्थितीपर्यंत कसे पोंहोचतॊ ते उशड महत्वाचे आहे. 

जीवनाचा प्रवास आणि त्याची प्रचिती देणारा क्षण कधीच कोणाला विसरायचा नसतो. 

एक छान मराठी कविता 

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || 

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले.


मग एका क्षणी या सर्व आपणास माहित आहे याची आठवण होते तो क्षण एक अज्ञात व्यक्तीच्या कवितेतूनआपणासाठी सादर करीत आहे....शेवटपर्यंत आपण वाचा आणि काय वाटले ते कंमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. 

आपला,

मी मराठी,

दत्तात्रय कृष्णा निकम 

Post a Comment

0 Comments